तु आणि मी
लपेटतेस जेव्हा कोवळे उन केसांत तुझ्या,
गंध त्यांचा दरवळतो इथे भोवताली माझ्या.
माळतेस तु मोगरा जेव्हा कचपाशांत तुझ्या,
होतो मी इथे सुगंधित जसा सडा फुलांचा बागेतल्या.
ओवतेस जेव्हा तु नाव माझे रेशमी सादेत तुझ्या,
होतो जीव पिसा माझा लगेच तुझ्यापर्यंत पोहोचण्या.
बघतेस तु जेव्हा प्रतिबिंब स्वतःचे आरशात आपुल्या,
भिडते नजर तुझी मला आरपार नयनांतुन तुझ्या.
हसतेस जेव्हा तु फुलवुन कळ्या दंतपंक्तींच्या,
पाहतो फुललेला बहर वसंताचा मी मनात माझ्या.
रमतेस जेव्हा तु सुंदर सोनेरी आठवणींत माझ्या,
लागते ऊचकी मला तेव्हा चिंब भिजण्या आठवांत तुझ्या.
केलेस काही जरी तु झंकारतात बंध प्रेमाचे आपुल्या,
येते मजला अनुभूती संजीवनीची बरसत धारा अमृताच्या.
प्रसाद कर्पे
No comments:
Post a Comment