धरेवर मनातल्या फुलते
धरेवर मनातल्या फुलते मलमल तृणांची येता हात तुझा हाती,
किणकीण बांगड्यांची करते रोमांच उभी अवघ्या माझ्या कायेवरी.
लागता चाहुल तुझी पटते ओळख नव्याने माझी मलाच जन्माजन्मांची,
तुझ्यासाठीच मग मला वाटते घालाविशी शब्दांची सुंदर रांगोळी.
पुर येतो भावनांना धडधडतो मनांत नाजुक संवेदनांचा वन्ही,
सप पुकारीती गात्रे सारी म्हणती साथ त्यांना तुझीच हवी.
उमलून येतो मी सुटतात भावभावनांच्या गुंतवळीची वेटोळी,
अचंबित होतो मी बदलत्या रुपावरी येते शंका खराच का हा तोच मी.
कचपाशांत तुझ्या वाटते रहावे गुंतवुनी मन माझे सांजसकाळी,
विसरुन दुनिया सारी फक्त वाटते गावित कवने तुझ्या स्तुतीची.
केलीस कशी जादु तु की सगळी दुनिया गेली माझी मंत्रवुनी,
अडकलेल्या जीवनचक्राला माझ्या तुझ्याच मुळे लाभली गती.
प्रसाद कर्पे
No comments:
Post a Comment