Monday 24 August 2015

स्वप्नांत रात्रीच्या गर्भातल्या

स्वप्नांत रात्रीच्या गर्भातल्या


स्वप्नांत रात्रीच्या गर्भातल्या मी बहर रातराणीचा अनुभवतो,

नज़रबंदी झालेल्या व्याधासमे तुझ्याविना मी तळमळतो.

मनातल्या मुक्या कळीलाही चाहुलीने तुझ्या बहर येतो,
उधळीत दवबिंदु जसा प्रथम प्रहरी अवखळ वारा उधळीतो.

तु दिसता चांदवा मनातला छेडीत तारा राग सतारीचा गातो ,
नजरभेट आपुली होता थवा फुलपाखरी विचारांचा उडतो.

गहि-या स्पर्शातल्या तुझ्या झिंग नशेची आठवुनी रोमांचित मी होतो,
श्वासांतल्या तुझ्या गंधाच्या जादुने बेहोषीत किनाराही माझा बुडतो.


भेटलो कितीदा जरी सहवास तुझा नितनुतन मला वाटतो,
दशदिशांतुन होणा-या आभासांनी तुझ्या शुक्र मनातल्या क्षितिजावरी चमचमतो.

                                                                                                 प्रसाद कर्पे 

No comments:

Post a Comment