Monday, 17 August 2015

जाते कोशात फुलपाखरु


जाते कोशात फुलपाखरु

जाते कोशात फुलपाखरु मनातले संपता संवाद तुझ्याशी,
बेसुर होउन जाते माझी बासरी पाहुन वाट तुझी सारखी.

विलोपते चेह-यावरील स्मिताची नक्षी उमटते आठ्यांची जाळी,
गंध वा-याचाही येईनासा होतो होते अपशकुनांची गर्दी.

जातात शब्द साथ सोडुनी वाटते असेच रहावे एकाकी,
सोडुन जातेस तु जेव्हा येतात सामो-या अंधाराच्या भिंती.

एरवीची सुंदर कुंद आभाळमाया वाटाया लागते नकोशी,
तप्त सुर्य अंगावरी घ्यावा वाटतो घेउन शिक्षा स्वतःच स्वतःची.

तु नसता कोंडल्या भावनांची होते फक्त पुनः पुनः मुस्कटदाबी,
वाटतो घ्यावा वेध गगनाचा पण अडविते दुनियेची दंडाबेडी.

सोडुन वाटते द्यावेसे स्वतःला साधुन जवळीक उफाटत्या लाटांशी,
असाच राहीला दुर किनारा तर विरघळतील सगळ्या उमेदी.

आणशील का तु सुर अंतर्यामीचा पुन्हा एकदा खेचुनी,
वाट पाहतो रात्रंदिन फक्त आता गंध तुझा दरवळण्याची.

                                                                  प्रसाद कर्पे 

No comments:

Post a Comment